४ जानेवारीला खान्देश शिक्षण मंडळाची निवडणूक : आजपासून अर्ज विक्रीला सुरुवात..

0
New-Doc-12-10-2025-09.34.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर खान्देश शिक्षण मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून १० डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज विक्रीला सुरुवात होत आहे. मंडळातील आठ संचालक, अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष आणि एक विश्वस्त अशा पदांसाठी निवडणूक होणार आहे. खा.शि. मंडळाच्या घटनेनुसार कार्यकारी मंडळाला अधिकार असल्याने संचालक पदांसाठी चुरशीची लढत अपेक्षित आहे.

१३ ते १६ डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून १७ रोजी अर्ज छाननी होईल. २० डिसेंबरपर्यंत माघारी घेण्याची अंतिम मुदत असून त्याच दिवशी मंडळाच्या कार्यालयात निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. प्रताप महाविद्यालयात ४ जानेवारी रोजी मतदान होणार असून ५ जानेवारी रोजी इंदिराभवन येथे मतमोजणी पार पडणार आहे.

दरम्यान, सत्ताधारी कार्यकारी मंडळाने आपले आशीर्वाद पॅनल जाहीर करून प्रचाराला वेग दिला आहे. या पॅनलमध्ये डॉ. संदेश गुजराथी, निरज अग्रवाल, योगेश मुंदडा, प्रदीप अग्रवाल, हरी भिका वाणी, डॉ. अनिल शिंदे, जितेंद्र जैन आणि कल्याण पाटील यांचा समावेश आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात दुसरे पॅनल उभे करण्याची तयारी सुरू असून त्यात प्रवीण पाटील, पंकज मुंदडा, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. अविनाश जोशी, अजय केले आणि प्रवीण जैन यांची नावे चर्चेत आहेत.

मंडळात यंदा ५ हजार ४९१ मतदार असून मागील निवडणुकीतील ५ हजार ७२१ मतदारांपेक्षा संख्या कमी झाली आहे. २३० मतदार मयत असल्याचे पुरावे मिळाल्यामुळे त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. आणखी काही मतदार मयत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक उपसमितीचे चेअरमन पंडित चौधरी, मनोहर महाजन, सुनील गरुड आणि विवेक भांडारकर हे निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed