गुंडगिरीच्या गुन्ह्यांमुळे चेतन उर्फ सत्तू धोबीला सहा महिन्यांची हद्दपारी.
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर : शहरातील पैलाड भागातील शिवाजी नगर येथील रहिवासी चेतन उर्फ सत्तू किरण धोबी याला उपविभागीय दंडाधिकारी मयूर भंगाळे यांनी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे. चेतन धोबी यांच्या विरोधात विनाकारण गुंडागर्दी, दादागिरी करून दहशत निर्माण करणे अशा स्वरूपाचे चार गंभीर गुन्हे नोंद असल्याने पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्फत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला होता.

दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून, तसेच सार्वजनिक शांततेला व नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका असल्याचे मान्य करून उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी चेतन धोबी यास जळगाव जिल्ह्याबाहेर सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय दिला आहे.
