धनदाई महाविद्यालयात एड्स जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न..

0
New-Doc-12-07-2025-07.49.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : येथील धनदाई महाविद्यालयात रेड रिबन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाला प्रशिक्षक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक अश्वमेघ पाटील, दिपक शेलार, जयेश मोर व देवेंद्र मोर यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून किसान महाविद्यालयाचे डॉ. माणिक बागले व मारवड महाविद्यालयाचे डॉ. जितेंद्र माळी, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर NSS कार्यक्रम अधिकारी डॉ. महादेव तोंडे यांनी उपक्रमाचा हेतू व उद्देश स्पष्ट केला.

समुपदेशक अश्विन पाटील यांनी यंदाच्या घोषवाक्याचा — “एकजुटीने एच.आय.व्ही.-एड्सला लढा देऊ, नवे परिवर्तन घडवू” — उल्लेख करत विद्यार्थ्यांना एड्स विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. एड्सची कारणे, त्यावरील समज-गैरसमज, उपलब्ध उपचारपद्धती, तसेच ग्रामीण रुग्णालयात राबविण्यात येणारे उपक्रम आणि शहरातील वैद्यकीय सुविधांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांनी मिळालेली जनजागृती आपल्या मित्रांपर्यंत व समाजातील इतर व्यक्तींपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. लीलाधर पाटील, प्रा. मीनाक्षी इंगोले, प्रा. रवींद्र चौधरी, डॉ. भगवान भालेराव आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed