जामिया अक्लकुवा संस्थेविरुद्धचे आरोप फोल; सत्याने उघड केला प्रोपगंड्याचा पर्दाफाश..

0
New-Doc-12-07-2025-07.31.jpg


प्रतिनिधी – अक्लकुवा

अक्लकुवा :गेल्या ४७ वर्षांपासून जामिया अक्लकुवा ही देशभरातील सर्व समाजघटकांना — धर्म, जात, पंथ यांच्या भेदभावाशिवाय — शिक्षण, आरोग्य, जनकल्याण आणि मानवसेवा पुरवणारी एक प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते.
सरकारची जबाबदारी असलेल्या शिक्षण, रोजगार, वैद्यकीय मदत, पाणीपुरवठा, अनाज वितरण, घरकुल सहाय्य तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतकार्यापर्यंत अनेक सेवा ही संस्था निःस्वार्थपणे पुरवते.

यामुळे जामिया ही राष्ट्रीय स्तरावरील आदर्श मानवसेवा संस्था मानली जात असताना, गेल्या दोन वर्षांपासून तिच्याविरोधात केल्या जाणाऱ्या बनावट आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोपांनी वातावरण दूषित केले आहे.

एफसीआरए रद्द प्रकरणाचे खरे तथ्य

एफसीआरए संदर्भातील आरोपांची जी चित्रे काही गटांकडून प्रसारित केली गेली, ती वस्तुस्थितीपासून पूर्णपणे दूर असल्याचे दस्तऐवजांमधून स्पष्ट झाले आहे काश्मीरमध्ये कंबल वितरणाला संशयित व्यवहार म्हणून सादर केले गेले प्रत्यक्षात कंबल नंदुरबारमधील अधिकृत व्यापाऱ्याकडून खरेदी करण्यात आले पेमेंट बँकेमार्फत झाले होते आणि ई-वे बिलवर संस्थेचा एफसीआरए नंबर असल्याने गैरसमज निर्माण झाला.

संस्थेने सर्वोच्च न्यायालयातील वकिलामार्फत हे संपूर्ण सत्य सादर केले.

महत्त्वाचे म्हणजे—ना त्या काश्मिरी संस्थेला पैसा दिला गेला, ना कोणताही संबंध होता. फक्त मालाचे वितरण झाले होते.

खालिद खज़गी यमनी प्रकरण : कायद्याचा चुकीचा वापर?

खालिद खज़गी हे यमनचे नागरिक वैध व्हिसावर भारतात आले होते.
व्हिसाची मुदत संपल्यानंतर यमनमधील अराजक परिस्थिती आणि विमानसेवा बंद असल्यामुळे त्यांचा फक्त १० दिवसांचा ओव्हरस्टे झाला तरीही त्यांच्यावर कठोर कलमाखाली गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली जबलपूर हायकोर्टाने त्यांना यमन कॉन्स्युलेटच्या ताब्यात दिले.

संपूर्ण प्रक्रिया अक्लकुवामध्ये कायदेशीर मार्गाने पूर्ण झाली.

तरीही या प्रकरणात जामियाचे संस्थापक मौलाना गुलाम मोहम्मद वसतानी आणि उत्तराधिकारी मौलाना हुजैफा यांना अनाठायीपणे गोवण्यात आले.
गंभीर आजारात असूनही त्यांना पोलिसांसमोर हजर राहावे लागले.

खदीजा खालिद प्रकरण : मानवतेला काळिमा

एक यमनी महिला आपल्या दूधपित्याऱ्या बालकाशी भारतात शरणार्थी म्हणून राहत होती.
त्यांना चौकशीच्या नावाखाली जेलमध्ये टाकण्यात आले आणि त्यांचे मूल त्यांच्यापासून वेगळे करण्यात आले. नंतर न्यायालयाने जामिनावर सुटका केली या वागणुकीने मानवतेलाही लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली.

आधार कार्ड प्रकरणातील गैरसमज

सर्व प्रक्रिया कायदेशीर परवानगीने आणि नियमांचे पालन करून करण्यात आली जुन्या कायद्यानुसार १८० दिवसांच्या वास्तव्यानंतर आधार मिळू शकत होता मुलांची उत्पत्ती व नागरिकत्व यमनचे असल्याचे दस्तऐवजांमध्ये स्पष्ट होते त्याच आधारावर यमन दूतावासाने पासपोर्ट जारी केले.

जामियाची शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा

जामियाच्या शाळा–कॉलेजांमध्ये ३०% पेक्षा जास्त गैर-मुस्लिम विद्यार्थी शिक्षण घेतात गेल्या ३० वर्षांमध्ये सुमारे ९,००० पेक्षा अधिक गैर-मुस्लिम विद्यार्थी

डॉक्टर, इंजिनिअर, फार्मासिस्ट, नर्स, आयटीआय, बीएड, एसएससी, एचएससी
अशा विविध क्षेत्रांत यशस्वी होऊन देशसेवा करत आहेत स्थानिक पातळीवर संस्थेविरुद्ध कुठेही नैसर्गिक किंवा ठोस विरोध आढळून आला नाही.

ईडी तपासही निराधार.

दुष्प्रचारातून प्रकरण ईडीपर्यंत नेले गेले.
तपासात जामियाकडून कोणतेही गैरकायदेशीर आर्थिक व्यवहार सापडले नाहीत दोन ट्रस्टींच्या व्यक्तिगत आर्थिक व्यवहारांना जामियाशी जोडून खोटी कथा तयार केली गेली.

मानवसेवा हा गुन्हा ठरतो का?

या देशात जर—शिक्षण देणे,आजारींची सेवा करणे,

गरीबांना पाणी–अन्न पोहोचवणे,आपत्तीत मदत करणे,अनाथ–विधवांना आधार देणे हा गुन्हा मानला जात असेल, तर प्रत्येक मदतगार नागरिक गुन्हेगार ठरेल मौलाना गुलाम मोहम्मद वसतानी यांच्या महान सेवांचा योग्य सन्मान करण्याऐवजी,
त्यांच्यावर निराधार आरोप करून त्यांना त्रास देणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज

जामिया अक्लकुवा ही सेवा, शिक्षण आणि मानवतेची प्रतिक असलेली संस्था आहे.
तिच्यावर होणारी अन्यायकारक बदनामी थांबवण्यासाठी सत्य जनतेसमोर आणणे अत्यावश्यक आहे.

अल्लाह ताआला या संस्थेचे रक्षण करो आणि लवकर न्याय प्रदान होवो.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed