इंजि. सौ. संगीता दिनेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहिवद येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५० दात्यांनी केले रक्तदान..

0
New-Doc-12-07-2025-07.11.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर : इंजि. सौ. संगीता दिनेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दहिवद येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला ग्रामीण भागातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. समाजोपयोगी उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या पाटील कुटुंबाच्या पुढाकारामुळे तब्बल ५० युवक व नागरिकांनी रक्तदान करून या मानवतावादी कार्याला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

ग्रामीण पातळीवर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती व सहभाग दिसून येत असल्याने उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुकाचे सूर आहेत.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी दहिवद ग्रामपंचायत, महिला बचत गट, विविध कार्यकारी सोसायट्या तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. ७०० ते ८०० नागरिकांनी सौ. संगीता पाटील यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. वाढदिवसाच्या दिवशी एवढा मोठा जनस्नेह मिळाल्याने कुटुंबीयांमध्येही आनंदाचे वातावरण होते.

वाढदिवसाचे औचित्य साधून सौ. पाटील यांनी आपल्या सासऱ्यांच्या कै. सुरेश देविदास पाटील यांच्या स्मरणार्थ गावातील भजनी मंडळास हार्मोनियमची भेट दिली. पारंपरिक कीर्तन-भजन परंपरेला चालना देणारी ही भेट गावकऱ्यांमध्ये आनंदाचा विषय ठरली.

Blood donors were felicitated with certificates as a token of gratitude. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक तरुणांनी नियोजनापासून व्यवस्थापनापर्यंत मोलाची भूमिका बजावली.

समाजातील आरोग्यजागृती, लोकसंपर्क आणि संस्कृती जतन या तिन्ही स्तरांवर हा उपक्रम प्रभावीपणे पार पडल्याने संपूर्ण पंचक्रोशीत या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed