मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडला; डिसेंबरमध्ये दोन हप्ते मिळण्याची शक्यता..

0
New-Doc-12-06-2025-08.17.jpg


आबिद शेख/ अमळनेर
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असून आचारसंहिता अद्याप शिथिल झालेली नाही. याचा परिणाम म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अजूनही हजारो लाभार्थी महिलांना मिळालेला नाही.

लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ४ डिसेंबरला मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र २४ नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान २० डिसेंबरला होत असल्याने, निकाल जाहीर होईपर्यंत हा हप्ता रोखण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, डिसेंबर महिन्यात लाभार्थींना एकाचवेळी दोन हप्ते जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच महिलांच्या बँक खात्यात नियमित १५०० रुपयांऐवजी थेट ३००० रुपये जमा होऊ शकतात.

याबाबत शासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेले नसली तरी प्रशासकीय पातळीवरील हालचालींमुळे लाभार्थींमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
राज्यातील लाखो महिलांचे याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed