अमळनेर तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र स्वीकार प्रक्रिया ठप्प; नागरिकांची मोठी गैरसोय – तातडीने प्रक्रिया पूर्ववत करण्याची मागणी..

0
New-Doc-12-06-2025-08.29.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर अमळनेर तालुक्यात महसूल विभागामार्फत विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्र (Affidavit) स्वीकारण्याची प्रक्रिया काही दिवसांपासून ठप्प झाली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांपासून शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यवसायिक ते सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वच स्तरांवर मोठी गैरसोय निर्माण झाली आहे जात, उत्पन्न, राहिवासी, नार्मातरण, वारस नोंद यांसह अनेक शासकीय प्रमाणपत्रांसाठी प्रतिज्ञापत्र अनिवार्य असते. मात्र तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्र स्वीकारले जात नसल्याने अनेकांच्या शासकीय कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत. शासनाच्या विविध योजनांचे लाभ, शालेय–महाविद्यालयीन प्रक्रिया, बँकिंग कामकाज तसेच इतर कायदेशीर प्रक्रिया प्रलंबित राहिल्यामुळे नागरिक संतापले आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे खालील मागण्या करत तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे महसूल विभागात प्रतिज्ञापत्र स्वीकारण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ववत करण्यात यावी आवश्यक असल्यास नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जाहीर करून स्पष्टता करावी.
नागरिकांचे दैनंदिन कामकाज सुरळीत व्हावे यासाठी तातडीची कार्यवाही करावी.
ही मागणी मा. नामदार गिरीशभाऊ महाजन (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. खा. स्मिता उदय वाघ (खासदार, जळगाव) आणि मा. आमदार अनिल भाईदास पाटील (अमळनेर विधानसभा) यांच्याकडेही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे.
नागरिकांना तातडीचा दिलासा मिळावा आणि तहसील कार्यालयातील कामकाज सुरळीत व्हावे, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 128200

22 Ct सोने 91.60% : ₹. 118000

18 Ct सोने 75.00% : ₹. 97500

शुद्ध चांदी 999%:₹. 1770/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed