डॉ. राजू महाले सरांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा : शिक्षण, पत्रकारिता आणि समाजसेवेचा उज्ज्वल प्रवास..

0
New-Doc-12-05-2025-10.32.jpg


आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :शिक्षक,ज्येष्ठ पत्रकार आणि समाजविकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले डॉ. राजू (डिगंबर) महाले यांचा वाढदिवस आज डॉ. महाले हे एक बहुगुणी, अभ्यासू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक म्हणून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यात सकारात्मक बदल घडविला. त्यांच्या शिकवण्याच्या शैलीने विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडले, तर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेच्या विकासासाठी अनुकरणीय कार्य केले. सुव्यवस्था, शिस्त आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचे सुंदर संतुलन साधत त्यांनी संस्थेला नवे शिखर गाठून दिले.

पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय आहे. सडेतोड लेखन, तथ्याधारित बातमीदारी आणि सामाजिक भान जपणारा दृष्टिकोन यामुळे त्यांनी पत्रकारितेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. समाजातील विविध विषयांवर भाष्य करताना त्यांच्या लिखाणाने नेहमीच सकारात्मक बदलासाठी मार्गदर्शन केले.

एक जेष्ठ बंधू म्हणून ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. गरज पडल्यास तात्काळ मदतीला धावून जाणे, योग्य मार्गदर्शन देणे आणि सर्वांच्या समस्या शांतपणे ऐकून सोडवणे ही त्यांची सहज प्रवृत्ती आहे.

मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाज मध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. संस्थेद्वारे रोजगारनिर्मिती, शिस्तबद्ध उपक्रम आणि भाविकांसाठी उत्तम व्यवस्था उपलब्ध करून देत त्यांनी सामाजिक कार्याला नवे आयाम दिले आहेत. मंगळ ग्रह मंदिराचा परिसर विकसित करून त्याला आध्यात्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. विविध राजकीय, सामाजिक, साहित्यिक व्यक्तिमत्त्वांनी या मंदिराला भेट दिलेली असून, हा ठिकाण आज अनेकांसाठी प्रेरणास्थान बनले आहे.

डॉ. राजू महाले सरांचे साधेपणा, संवेदनशीलता, कणखर नेतृत्व आणि समाजहिताची नितांत भावना ही त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या कर्तृत्वाने आजवर अनेकांना प्रेरणा मिळाली असून, आगामी काळातही ते समाजासाठी मार्गदर्शक ठरतील, अशी सर्वांची श्रद्धा आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अधिकाधिक यश लाभो, हीच प्रार्थना.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed