अमळनेर निवडणूक : ईव्हीएम स्ट्राँग रूमला २४ तास बंदूकधारी पोलिसांचा कडक पहारा..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन शहरातील इंदिरा गांधी भवन येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया संवेदनशील असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून स्ट्राँग रूमला २४ तास बंदूकधारी पोलिसांचा कडक पहारा पोलिस प्रशासनाकडून तैनात करण्यात आला आहे.

नगरपालिका निवडणुकीत २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. शहरातील एकूण १८ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक ८ (अ) येथील नगरसेवक बिनविरोध निवडले गेले आहेत, तर प्रभाग क्रमांक १ (अ) मधील नगरसेवक पदाचे मतदान २० डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीचे ६ उमेदवार आणि नगरसेवक पदासाठीचे १२६ उमेदवार असे एकूण १३२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
शहरातील ९७ मतदान केंद्रांवरील सर्व ईव्हीएम मशीन इंदिरा गांधी भवनातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली असून संपूर्ण परिसराला तारेच्या जाळीचे कुंपण करून चारही बाजूंनी बंदूकधारी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. परिसरात सामान्य नागरिकांच्या प्रवेशास सक्त मनाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या सततच्या निगराणीत आहे.
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि सुरक्षेसाठी हे सर्व खबरदारीचे उपाय काटेकोरपणे राबविण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव
24 Ct सोने 99.50% : ₹. 128200
22 Ct सोने 91.60% : ₹. 118000
18 Ct सोने 75.00% : ₹. 97500
शुद्ध चांदी 999%:₹. 1770/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%
