अमळनेर : मंगरूळ–पिंपळे रस्ता दुरवस्थेत; नव्याने झालेले काम दोषयुक्त, नागरिकांमध्ये नाराजी..

0
New-Doc-12-05-2025-08.47-1.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील मंगरूळ ते पिंपळे रस्ता दुरवस्थेला आला आहे. नुकतेच केलेल्या डांबरीकरणाच्या कामानंतर अवघ्या काही महिन्यांतच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून साईड पट्ट्या सहा–सात महिने उलटूनही न भरल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मंगरूळ–पिंपळे रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असून काम सुरू असतानाच साईड पट्ट्यांची भरणी करण्यात आली नाही. परिणामी समोरासमोरून जाणाऱ्या वाहनांना अरुंद रस्त्यावरून मार्ग काढताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. दुचाकीस्वार तर अधिकच धोक्यात असून किरकोळ अपघातांच्या घटना वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

रस्त्याचे काम मंजूर असूनही ठेकेदाराकडून अद्याप जवळपास एक किलोमीटरचा रस्ता विकसित करण्यात आलेला नाही. या नादुरुस्त भागात मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे.

दरम्यान, नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ठेकेदाराला समज देऊन गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करून घेण्याची मागणी वाढत आहे. रस्त्याची निकृष्ट स्थिती दूर न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed