शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण : मोठे अधिकारी, संस्थाचालक आणि मुख्याध्यापक पोलिसांच्या रडारवर; निवृत्त उपसंचालक उपासनी ८ डिसेंबरपर्यंत कोठडीत..

0
New-Doc-12-05-2025-07.22.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर — राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास दिवसेंदिवस गंभीर व व्यापक होत चालला आहे. या प्रकरणातील आरोपी निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेनंतर आर्थिक गैरव्यवहाराची मोठी साखळी उघडकीस येण्याची चिन्हे आहेत.
जादा पदे, बनावट आयडी आणि कोट्यवधींचा घोटाळा
जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध ठिकाणी संच मान्यतेपेक्षा अनेक पटीने जादा पदे भरली जात, त्यासाठी बनावट शालार्थ आयडी तयार करून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा मोठा आरोप आहे. आर्थिक गुन्हा शाखेच्या तपासात काही महत्त्वाचे पुरावे समोर येताच, प्रशासनातील अनेकांचे हालचाली वाढल्या आहेत.
सेवाकाळ व निवृत्तीनंतरही बनावट स्वाक्षऱ्यांचे पुरावे नितीन उपासनी यांनी सेवाकाळात तसेच निवृत्तीनंतरही अनेक दस्तऐवजांवर विवादित स्वाक्षऱ्या केल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. त्या आधारे ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली. ४ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्यात आली.
आरोपी उघड करत आहेत नवी नावे
आरोपींची चौकशी सुरू होताच “खाक्या” दाखवताच ते इतर संबंधितांचेही नावे उघड करीत आहेत, अशी माहिती तपास पथकाने दिली आहे. या घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता तपास अधिक व्यापक केला जात आहे.

मोठे अधिकारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक रडारवर
तपासाच्या प्राथमिक निष्कर्षानुसार, या घोटाळ्यात काही वरिष्ठ अधिकारी, अनेक मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांचा सहभाग असण्याची शक्यता तपास पथकाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये आणि संबंधित कार्यालयांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तपास आणखी खोलात जाणार
दरम्यान, आर्थिक गुन्हा शाखा या प्रकरणात अजून काही मोठी नावे समोर येऊ शकतात, असा संकेत तपास अधिकाऱ्यांनी दिला आहे. शालार्थ आयडीच्या माध्यमातून झालेला हा मोठा आर्थिक घोटाळा शिक्षण विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.

रवि ज्वेलर्स,अमळनेर,
सोने चांदी आजचे भाव

24 Ct सोने 99.50% : ₹. 128200

22 Ct सोने 91.60% : ₹. 118000

18 Ct सोने 75.00% : ₹. 97500

शुद्ध चांदी 999%:₹. 1770/-
भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed