अमळनेर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तौसीफ तेली — युवा नेतृत्वाला नवी दिशा.
आबिद शेख /अमळनेर
अमळनेर शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी तौसीफ तेली यांची नियुक्ती करण्यात आली असून, युवक संघटनेला नवचैतन्य देणारा हा निर्णय मानला जात आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, उपाध्यक्ष प्रशांत ओगले, सह-प्रभारी शांभवी शुक्ला, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख राहुल माणिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

रिक्त असलेल्या शहराध्यक्ष पदावर युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तौसीफ तेली यांची नियुक्ती जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून करण्यात आली.
कार्यक्रमाला जळगाव जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील, युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सईद तेली, अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हर्षल जाधव, इद्रीस बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तौसीफ तेली हे शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे युवा कार्यकर्ते असून, काँग्रेसचे जेष्ठ नेते अब्दुल सत्तार तेली यांचे चिरंजीव आणि माजी शहराध्यक्ष सईद तेली यांचे बंधु आहेत. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
