अमळनेरमध्ये ४० गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना २ डिसेंबरपर्यंत शहरात प्रवेशबंदी..

0
New-Doc-12-02-2025-07.49.jpg

आबिद शेख/अमळनेर


नगरपालिका निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी अमळनेर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेले व कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण करण्याची शक्यता असलेल्या अशा ४० जणांना शहरात प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिली.

भारतीय न्याय संहिता कलम १६३ अंतर्गत ३० नोव्हेंबरपासून २ डिसेंबर दुपारी दोन वाजेपर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. या कालावधीत संबंधित व्यक्तींना शहराबाहेर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी २ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेनंतर त्यांना मतदानासाठी शहरात प्रवेश दिला जाणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed