अमळनेर बाजार समिती २ व ४ डिसेंबरला बंद; ३ रोजी नियमित कामकाज..
आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर — अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समिती २ डिसेंबर आणि ४ डिसेंबर रोजी दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. २ डिसेंबर रोजी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमुळे तसेच ४ डिसेंबर रोजी माजी बाजार समिती संचालक पावभा अमृत पाटील यांच्या निधनानिमित्त समितीचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, ३ डिसेंबर रोजी बाजार समितीचे सर्व व्यवहार आणि दैनंदिन कामकाज पूर्ववत सुरू राहणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांसह बाजार समितीशी संबंधित व्यापारी, हमाल, अडते आणि इतर लाभार्थ्यांनी या बंद दिवसांची नोंद घेऊन आपल्या व्यवहारांचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बाजार समितीच्या बंद निर्णयाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
