प्रभाग १८ (ब) मध्ये ‘छत्री’ चिन्हाची जोरदार घोडदौड; रूपाली शिवदे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रभाग १८ (ब) मध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. अलीकडील प्रचारदौऱ्यात उमदेपणाने सामील झालेल्या नागरिकांच्या सहभागामुळे ‘छत्री’ निवडणूक चिन्हाची स्थिती अधिक मजबुत झाल्याची चर्चा स्थानिक स्तरावर जोर धरत आहे.

घरफेरीदरम्यान मिळालेला जबरदस्त उत्साह, महिलांचा वाढता सहभाग आणि युवकांचा ठोस पाठींबा पाहता रूपाली शिवदे यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. विशेषतः महिलांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक भावना दिसून येत असून युवकांमध्येही बदलाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“प्रभागाचा सर्वांगीण विकास हा माझा शपथ धोरण” – रूपाली शिवदे
मतदारांच्या अपेक्षा ओळखून त्यांची पूर्तता करण्याचा निर्धार व्यक्त करताना रूपाली शिवदे म्हणाल्या,
“प्रभागाचा सर्वांगीण विकास, स्वच्छ व सुरक्षित परिसर, महिलांसाठी सुलभ सुविधा आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हेच माझे ध्येय आहे.”
त्यांनी जनतेसमोर प्रामाणिकपणे काम करण्याच्या आणि नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याच्या बांधिलकीची पुन्हा एकदा पुनरुज्जीवन केले.
स्थानिक वातावरण पाहता प्रभागात ‘छत्री’ निवडणूक चिन्हास अनुकूल हवा मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. प्रचारात मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता रूपाली शिवदे यांच्या विजयाबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आणि आशावाद वाढताना दिसत आहे.
