प्रभाग १३ (ब) : हाजी सलीम शेख फत्तू यांच्या विकासदृष्टीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विजयी लाटेची चाहूल!
आबिद शेख/अमळनेर
प्रभाग १३ (ब) मधील नागरिक पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, प्रकाशव्यवस्था आणि ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर स्पष्ट, पारदर्शक आणि टिकाऊ समाधानाची अपेक्षा बाळगत आहेत. या सर्व समस्या सोडवण्यासाठी हाजी सलीम शेख फत्तू यांनी गेल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा करत अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.

आगामी काळासाठी त्यांनी सुस्थित पाणीपुरवठा, महिलांसाठी सुरक्षित व स्वच्छ वॉर्ड निर्मिती, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा, तसेच सर्व समाजांचा सर्वसमावेशक विकास या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद – विजयी लाटेची चिन्हे?
हाजी शेखा यांच्या घरासमोर आणि प्रचारफेरीत मोठ्या संख्येने नागरिक स्वयंप्रेरणेने सहभागी होत आहेत. विशेषतः महिला वर्ग त्यांना “आपलेपणाने वागणारा खरा लोकप्रतिनिधी” म्हणून दाद देत असून, युवक वर्गही सक्रिय पाठिंबा देताना दिसत आहे.
