प्रभाग 13 ‘ब’ : अपक्ष उमेदवार सुनिल महाजन यांचा “स्टॅम्प पेपरवरील लोकप्रतिबद्ध संकल्प” ठरत राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू…
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या रणधुमाळीत प्रभाग क्र. 13 ‘ब’ मध्ये एक वेगळीच राजकीय हवा निर्माण झाली आहे. येथे केवळ सत्ता हस्तगत करण्याची स्पर्धा नाही, तर “सत्य, स्वच्छता आणि पारदर्शकतेचा लोकशाही प्रयोग” उभा राहताना दिसत आहे. कारण आहे — अनुक्रमांक 4, बॅट चिन्हाचे अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन यांची स्टॅम्प पेपरवरील लोकप्रतिबद्ध शपथ.

ही शपथ मतदारांसमोर त्यांची पारदर्शकता, जवाबदारी आणि प्रामाणिक राजकारणाची हमी देत मतदारांमध्ये अभूतपूर्व चर्चा व विश्वास निर्माण करत आहे.
सेवानिवृत्त पोलीस कॉन्स्टेबल ते स्वच्छ राजकारणाचा नवा चेहरा
सुनिल महाजन हे पोलीस खात्यातून निवृत्त झालेले, उच्चशिक्षित आणि प्रथमच निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत पोलीस सेवेत त्यांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा,निर्भीडपणा,तत्परता,निःपक्ष भूमिका,यामुळे ते समाजात “प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष” अधिकारी म्हणून ओळखले जात होते.
हीच प्रतिमा आता त्यांच्या राजकीय प्रवासाची ताकद ठरत आहे.
स्टॅम्प पेपरवरील शपथ — राजकारणात दुर्मीळ, पण लोकशाहीसाठी महत्त्वाची
सुनिल महाजन यांनी मतदारांसमोर स्टॅम्प पेपरवर अधिकृतपणे जाहीर केलेल्या शपथनाम्याची चर्चा सर्वत्र आहे. या शपथनाम्यात त्यांनी प्रभागातील विकासकामे, निधीचा पारदर्शक वापर, भ्रष्टाचारमुक्त शासन, तसेच नागरिकांशी सतत संपर्क आणि उत्तरदायित्वाची हमी दिली आहे ही शपथ केवळ राजकीय गोंडस घोषणा नसून कायदेशीरदृष्ट्या जबाबदारीचे वचन असल्याने मतदारांत त्यांची विश्वासार्हता अधिक दृढ होत आहे तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढता उत्साह
महाजन यांच्या सभ्य, अभ्यासू आणि शांत स्वभावामुळे तरुणांमध्ये सकारात्मकता
महिलांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास ज्येष्ठ नागरिकांमध्ये आश्वासकता
असा तिहेरी परिणाम दिसून येतो आहे.
“प्रभागात स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व हवे” अशी भावना व्यक्त करणाऱ्या नागरिकांना सुनिल महाजन हे योग्य पर्याय वाटत असल्याने त्यांच्या प्रचाराला अनपेक्षित गती मिळताना दिसत आहे.
सामाजिक प्रश्नांवरील ठाम भूमिका सुनिल महाजन हे अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. व्यसनमुक्ती स्वच्छता मोहिमा सार्वजनिक शिस्त युवकांना रोजगारोन्मुख मार्गदर्शन
अशा विषयांवर त्यांनी नेहमीच निर्भीडपणे आवाज उठवला आहे.
त्यांच्या या कारभारामुळे ते “कर्मशील” आणि “स्वच्छ राजकारणी” म्हणून ओळखले जात आहेत.
प्रभाग 13 ‘ब’ मध्ये निवडणूक रंगतदार
एकीकडे प्रभागात पारंपरिक राजकीय समीकरणे दिसत असली, तरी अपक्ष म्हणून उभे राहून सुनिल महाजन यांनी निवडणुकीच्या रंगात वेगळाच उत्साह निर्माण केला आहे.
त्यांच्या प्रचारातील साधेपणा, बॅट चिन्ह, आणि जनता-केंद्रित वचनांची चर्चा प्रभागभर होत आहे.
सुनिल महाजन यांची ही लोकप्रतिबद्ध प्रतिज्ञा प्रभाग 13 ‘ब’ च्या निवडणुकीला सकारात्मक आणि मूल्याधारित राजकारणाचे उदाहरण बनवत आहे.
