प्रभाग 13 मध्ये परिवर्तनाची लाट; सुनील महाजन ठरत आहेत “सामान्य घरातील, पण असामान्य धाडसाचा” उमेदवार

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये एक वेगळाच राजकीय उर्जावान माहोल पाहायला मिळत आहे. सामान्य घरातील असले तरी असामान्य धाडस, समाजाप्रती निष्ठा आणि लोकहितासाठी केलेला त्यांचा निर्णायक निर्णय यामुळे सुनील दयाराम महाजन हे नाव नागरिकांत वेगाने रूजत आहे.
पोलीस विभागातील नोकरीचा मोह बाजूला ठेवत, स्थिर करिअरला अलविदा करत आणि थेट लोकसेवेत उतरून “जनतेची सेवा हाच खरा धर्म” या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यांच्या या धाडसी पावलाने प्रभागातील नागरिकांच्या मनात वेगळाच विश्वास निर्माण केला आहे. जनतेसाठी धाडसी निर्णय घेण्याची तयारी असलेला उमेदवार अशी ओळख त्यांची पक्की होत आहे.
निवडणूक की समाजसेवेचा नवा अध्याय?
या निवडणुकीकडे नागरिक केवळ स्पर्धा म्हणून न पाहता समाजसेवेच्या नव्या अध्यायाची सुरुवात म्हणून पाहू लागले आहेत. सुनील महाजन यांनी मांडलेल्या जवाबदारी, पारदर्शकता आणि प्रामाणिक कामकाजाच्या संकल्पनांना नागरिक जोरदार प्रतिसाद देत आहेत.
प्रभागातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व स्तरांमध्ये “आता बदलाव हवा” ही भावना प्रखर होताना दिसते.
प्रभाग 13 मध्ये परिवर्तनाची मागणी तीव्र
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मूलभूत पायाभूत कामे, रस्ते, पाणी, स्वच्छता व्यवस्थेतील उणिवा, आणि प्रशासकीय प्रतिसादातील ढिलाईमुळे नागरिकांमध्ये परिवर्तनाची मागणी वाढली आहे.
यातूनच सुनील महाजन यांच्यासारख्या नव्या, ऊर्जस्वल आणि उत्तरदायित्व जपणाऱ्या नेतृत्वाच्या शोधाची वाट निर्माण झाली आहे.
महाजन यांच्या कार्यशैलीत पारदर्शकतेचा ठसा
समाजातील विविध घटकांशी थेट संवाद साधणे, सर्वसामान्यांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून त्यावर उपाययोजना करण्याचा दृष्टीकोन आणि राजकारणात स्वच्छ प्रतिमा टिकवण्याचा प्रयत्न—यामुळे मतदार त्यांच्या कार्यपद्धतीकडे आकर्षित होत आहेत.
विशेषतः तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल उत्साह वाढताना दिसतो. नोकरी सोडून जनतेसाठी उभे राहण्यामागील त्यांची भूमिकाच अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे जनतेच्या विश्वासाचा फायदा निश्चित. प्रभाग 13 मधील नागरिकांमध्ये तयार झालेली आपुलकी, विश्वास आणि बदलाची उत्कट इच्छा याचा फायदा सुनील महाजन यांना निःसंशयपणे मिळणार, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
त्यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात निवडणुकीची लढाई अधिकच रंगतदार होणार असून, परिवर्तनाचा नवा अध्याय प्रभाग 13 मध्ये लिहिला जाईल की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
