उद्योग महर्षी स्व.आर.के.दादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू, परीवाराच्या माध्यमातून राबविणार असंख्य उपक्रम..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – येथील आर.के.पटेल उद्योग समूहाचे जनक उद्योग महर्षी स्व.श्री.आर.के.दादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने ‘पटेल ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या संघास देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचे विमोचन काल प्रताप महाविद्यालयात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आर.के.दादा यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1926 रोजी झाला होता. त्यांचे हे जन्म शताब्दी वर्ष असून त्या निमित्ताने आर.के.परिवारातर्फे वर्षभर विविध प्रकारचे शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रताप महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट सामन्यात अमळनेर शहरातील बारा संघ सहभाग घेत आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत, शनिवार आणि रविवार या दिवशी हे सामने खेळविण्यात येणार आहेत. ‘पटेल ट्रॉफी’ या नावाने सुरू होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच खानदेश शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ संचालक हरी भिका वाणी, डॉ.अनिल शिंदे, आर.के.परिवाराचे विनोदभैय्या पाटील, प्रदीप अग्रवाल, निरज अग्रवाल, सेक्रेटरी प्रा.पराग पाटील, प्राचार्य हर्षवर्धन जाधव, प्रा.संदीप नेरकर, प्रा.कल्पना पाटील, प्रा.धनंजय चौधरी, प्रा. अमृतलाल अग्रवाल, प्रा.सचिन पाटील व इतर मान्यवर तथा प्रताप कॉलेजचे अधिकारी वर्ग तसेच सहभागी संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
