प्रभाग १८ (ब) मधून सौ. रुपाली शिवदे यांची दमदार एन्ट्री; “छत्री “निशाणीवर विकासाची नवीन आशा..

0
New-Doc-11-27-2025-21.30.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १८ (ब) सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघातून सौ. रुपाली विलास शिवदे यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या नावाची चर्चा प्रभागभर जोरदार रंगत आहे. साधेपणा, लोकाभिमुख दृष्टीकोन आणि प्रामाणिक जनसेवेची ओढ या तीन बळावर त्या प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

सौ. शिवदे यांनी प्रभागातील प्रत्येक कुटुंबाशी गेल्या काही महिन्यांत सातत्याने संवाद साधत त्यांची छोटी-मोठी अडचण प्रामाणिकपणे ऐकून घेतली. “फक्त गर्दी करण्यासाठी किंवा लोकप्रियता मिळवण्यासाठी राजकारणात आलेले नाही. लोकांच्या विश्वासाला न्याय द्यावा, त्यांचे प्रश्न कमी करावेत, हा एकच हेतू घेऊन उमेदवारी दिली आहे,” असे त्या भावनांनी सांगतात.

त्यांनी महिलांची सुरक्षा, पाणीपुरवठा, दर्जेदार रस्ते, स्वच्छता व्यवस्थेची मजबुती, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा, वृद्धांसाठी मदत योजनांचे सुलभीकरण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर वेगाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

सौ. शिवदे यांचा जिद्दीचा नारा — “एकच ध्यास – वार्डाचा सर्वांगीण विकास” — प्रभागातील नागरिकांच्या मनात वेगाने घर करत असून अनेक ठिकाणी याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातील महिलांचा वाढता सहभाग, युवांच्या भेटीगाठीतील उर्जा आणि नागरिकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहता त्यांच्या उमेदवारीला जोरदार हवा मिळत आहे.

सौ. रुपाली शिवदे यांची अधिकृत निवडणूक निशाणी ‘छत्री’ असल्याचे जाहीर करण्यात आले असून, त्या मतदारांना नम्र आवाहन करत म्हणतात—
“आपले मतदानरूपी आशीर्वाद ‘छत्री’ वर द्या… विश्वास ठेवा, आपल्या वार्डाचा विकास एका क्षणालाही थांबू देणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed