अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 — प्रभाग 13-ब मध्ये स्वच्छ, अभ्यासू आणि निस्वार्थ नेतृत्वाची हाक! अपक्ष उमेदवार सुनिल दयाराम महाजन. प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधका मध्ये धडकी.

0
New-Doc-11-26-2025-18.35.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर –नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 मध्ये यंदा अभूतपूर्व उत्साह आणि वेगळाच राजकीय रंग पाहायला मिळत आहे. या प्रभागात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे अमळनेर पोलीस स्टेशनचे माजी कर्मचारी सुनील दयाराम महाजन. समाजपरिवर्तनाची भूमिका स्वीकारत, नागरिकांना जागृत करण्याच्या ध्येयाने आणि मतदानाची जाणीव प्रबळ करण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतःच्या इच्छेनुसार व्हीआरएस घेत नोकरीचा मोह बाजूला ठेवला.
मोठ्या पगाराची सुरक्षित सरकारी नोकरी सोडून पूर्णवेळ लोकसेवेत उडी घेण्याचा त्यांचा निर्णय प्रभागात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत असून, जनतेत त्यांच्याबद्दल एक वेगळीच सकारात्मक लाट निर्माण होत आहे.
“सामान्य घरातील, पण असामान्य धाडस असलेला उमेदवार”
प्रभाग 13 मधील नागरिक आता सुनील महाजन यांना सामान्य घरातील, पण असामान्य धाडस असलेला उमेदवार म्हणून ओळखू लागले आहेत. नोकरीपेक्षा जनतेची सेवा अधिक महत्त्वाची मानणाऱ्या या उमेदवाराने दाखवलेले धाडस मतदारांवर प्रभाव टाकत आहे.
निवडणूक फक्त स्पर्धा न राहता समाजसेवेच्या नव्या अध्यायाची सुरुवात व्हावी, असा भावना नागरिकांमध्ये वाढताना दिसते.
जनतेत स्पष्ट परिवर्तनाची इच्छा
प्रभाग क्रमांक 13 मध्ये यावेळी परिवर्तनाची मागणी प्रचंड प्रमाणात जाणवते. नागरिकांना विकासाच्या नव्या दृष्टीकोनाची आणि जवाबदारीने काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याचे स्पष्ट वातावरण आहे.
सुनील महाजन यांनी लोकहिताला प्राधान्य देत केलेला निर्णय, त्यांच्या पारदर्शक कार्यपद्धतीची भूमिका आणि नव्या विचारांची दिशा पाहता मतदार यंदा नवा इतिहास रचतील अशी चर्चा जोरात सुरू आहे.
प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद – विरोधकांमध्ये धडकी
सुनील महाजन यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरात नागरिक त्यांचे स्वागत करत असून, युवक वर्गाने तर त्यांना मोठा पाठिंबा दिला आहे.

त्यांच्या प्रचारा मध्ये वाढणारी गर्दी आणि उमेदवाराबद्दल वाढणारा विश्वास पाहून विरोधक मात्र गोंधळलेले असून, त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांत आहे.

“प्रभागाचा विकास हेच ध्येय” – महाजन यांची भूमिका

राजकारणात फक्त पदासाठी नव्हे तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आलो असल्याचे सुनील महाजन नमूद करतात. प्रभागातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, महिलांच्या सुरक्षेचे उपाय, युवकांसाठी उपक्रम अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आराखडा तयार केला असल्याचे सांगितले आहे.

बॅट चिन्हावर विश्वास ठेवा – महाजन यांची विनंती

जनतेच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहण्याचे आश्वासन देत सुनील महाजन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की—
“बॅट चिन्ह समोर बटण दाबा आणि प्रचंड मतांनी मला विजयी करा, प्रभाग 13 च्या विकासाचा नवा अध्याय सुरू करूया.”

प्रभाग क्रमांक 13 मध्ये वाढती लोकप्रियता, जनतेचा वाढता विश्वास आणि उमेदवाराची धाडसी भूमिका पाहता आगामी निवडणुकीत सुनील महाजन जिंकण्याची शक्यता अधिक गडद होत असल्याची चर्चा आता सर्वत्र रंगताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed