जितेंद्र ठाकूर यांना सर्वच स्तरातून मतदारांचा उदंड प्रतिसाद…. गृहभेटी व कॉर्नर सभा घेऊन मांडत आहेत शहराच्या विकासाचे व्हिजन…
आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :- नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांच्या प्रचाराला शहरातील सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध भागांमध्ये घेण्यात आलेल्या कॉर्नर सभांमधून ठाकूर यांनी आपले विकासाचे व्हिजन स्पष्टपणे मांडले असून, मतदारांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
अमळनेर शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, वसाहती प्रभागांमध्ये ठाकूर यांचा प्रचारदौरा सुरू आहे. युवा, व्यापारी, महिलावर्ग, तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपली ठाम भूमिका मांडली असून पाणीपुरवठा सुधारणा, स्वच्छता व्यवस्थेचे आधुनिकीकरण, रस्ते-विविध सुविधा उभारणी, डिजिटल नगरपालिका, व्यापारी सुरक्षितता, तसेच नागरिकांसाठी तत्पर सेवा व्यवस्था यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठोस भूमिका घेतली आहे.
विविध प्रभागात कॉर्नर सभांमध्ये प्रभागनिहाय समस्यांचे समाधान, प्रशासनातील पारदर्शकता, आणि जनतेच्या सहभागातून शहराचा दीर्घकालीन विकास या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित कामकाजाची योजना त्यांनी मांडली. सततच्या संवादातून आणि जाहीर केलेल्या विकासाभिमुख भूमिकेमुळे शहरभर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून ठाकूर यांच्याबाबत विकासाभिमुख नेतृत्व अशी प्रतिमा अधिक दृढ झाली आहे. नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा आणि उपस्थितीमुळे ठाकूर यांचा प्रचार अधिक जोमाने पुढे जात आहे.
