प्रभाग १३(ब) मध्ये शेखा मिस्त्री यांची दमदार शक्तिप्रदर्शनाने निवडणूकिला रंगत..
आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर –नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३(ब) मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. रविवारी, दि. २३ रोजी दुपारी ४ वाजता अपक्ष उमेदवार हाजी सलीम शेख फत्तू (शेखा मिस्त्री) यांनी भव्य प्रचार रॅली काढत प्रभावी शक्तिप्रदर्शन केले.
या रॅलीत शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ‘शेखा हाजी पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमला.
आई सुगराबी शेख यांच्या आशीर्वाद(दुवा) घेत प्रचाराला निघाले
शेखा मिस्त्री यांनी त्यांच्या आई व माजी नगरसेवक सौ. सुगराबी शेख यांचा काळात केलेल्या विकासकामांचा आणि जनसंपर्काचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
शक्तिप्रदर्शनाने समीकरणे बदलली
या रॅलीनंतर प्रभाग १३(ब) मधील निवडणुकीची दिशा बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
शेखा हाजी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल झाली असून, लढत आता दोन प्रमुख गटांमध्ये चुरशीची होत असल्याचे जाणवते.
प्रभागात मोठा जनाधार असलेल्या मतदारांनी या रॅलीत उत्स्फूर्त सहभाग दाखवल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांना निश्चितच नवी रणनीती आखावी लागणार आहे मतदारांशी थेट संवादावर भर
रॅलीदरम्यान शेखा मिस्त्री यांनी नागरिकांना विकास, स्वच्छ प्रशासन आणि जनसुविधा यांवर आधारित आपली भूमिका स्पष्ट केली.
प्रभाग १३(ब) मध्ये चुरस वाढली
या दमदार शक्तिप्रदर्शनानंतर प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार झाली असून, स्थानिक पातळीवर चर्चा फक्त एका प्रश्नावर केंद्रित आहे — ‘शेखा मिस्त्रींची एन्ट्री कोणावर भारी पडणार?’
आगामी दिवसांत प्रचार आणखी जोरदार होण्याची चिन्हे असून, मतदार कोणाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.


