वार्डातील महिलांची पहिली पसंती जुबेदाबी शेख यांना उदंड प्रतिसाद !
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर –नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर वार्ड क्र. (१३अ) मध्ये शहर विकास आघाडीच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार जुबेदाबी शेख यांच्या प्रचार मोहिमेला दिवसेंदिवस वेग येत असून, नागरिकांकडून त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

प्रचाराच्या सुरुवातीपासूनच परिसरातील महिला वर्ग, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध समाजघटकांनी जुबेदाबी यांना मोठ्या संख्येने साथ दिली आहे. घरदारी भेटी, गल्लीभेट, लहान बैठकांमधील थेट संवाद आणि व्यक्तिगत संपर्कांमुळे त्यांच्या प्रचारात खास सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
जुबेदाबी शेख या प्रत्येक घरात जाऊन नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि गरजांची माहिती बारकाईने जाणून घेत आहेत. पाणीपुरवठा, रस्ते-विकास, स्वच्छता व्यवस्था, ड्रेनेज, लाईटिंग, महिला सुरक्षाविषयक सुविधा, तसेच युवकांसाठी क्रीडा व करिअरविषयक संधी अशा मुद्द्यांवर त्या नागरिकांना मार्गदर्शन करत आहेत.
स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, “जुबेदाबी यांचा शांत, सुसंस्कृत स्वभाव आणि काम करण्याची तळमळ आमच्यावर छाप पाडते. त्या वार्डासाठी योग्य आणि प्रामाणिक उमेदवार आहेत,” असे मत अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे.
जुबेदाबी म्हणाल्या की,
“नागरिकांचा आशीर्वाद आणि विश्वास हेच माझे सर्वात मोठे बळ आहे. प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि विकासाभिमुख पद्धतीने काम करण्याचा माझा संकल्प आहे. नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आणि वार्डाचा चेहरा बदलण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही जुबेदाबींच्या प्रचार मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला असून, त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे. येणाऱ्या दिवसांत प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता असून, वार्ड क्र. १३(अ) मधील वातावरण निवडणुकीकडे जलदगतीने झुकत आहे.
वार्डातील जनतेचा मिळणारा उत्साह पाहता, जुबेदाबी शेख या निवडणुकीत प्रभावीपणे पुढे जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
