अमळनेरमध्ये ‘आपल्यातीलच उमेदवार’ जितू ठाकूरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

0
New-Doc-11-24-2025-07.21.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. जितेंद्र (जितू) हरिश्चंद्र ठाकूर यांच्या प्रचाराला नागरिकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, शहरभरात “नगराध्यक्ष म्हणून आपल्यातील एकच पाहिजे – जितू ठाकूर!” असा आवाज घुमत आहे.
साध्या परिस्थितीतून वर आलेले, पत्रकारितेच्या माध्यमातून सतत अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे जितू ठाकूर ‘आपल्यातीलच माणूस’ म्हणून अमळनेरकरांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहेत जिथे जिथे ते प्रचारासाठी जातात, तिथे सर्व स्तरातील नागरिकांकडून मिळणारा स्वयंस्फूर्त, भरघोस जनसमर्थन पाहता आगामी निवडणुकीत त्यांची मजबूत छाप स्पष्टपणे जाणवत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे क सामान्य परिस्थितीतून उभे राहिलेले नेता नयायासाठी नेहमी अग्रभागी
लोकांशी आपुलकीने जोडणारे व्यक्तिमत्त्व
प्रामाणिक व विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळेच शहरात बदल आणि विकासासाठी योग्य पर्याय म्हणून जितू ठाकूरांची ओळख पक्की झाली आहे.
निवडणुकीत ‘शिट्टी’ हे चिन्ह कायम लक्षात ठेवून मतदान करावे, असे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed