प्रभाग १३ (ब) मध्ये अपक्ष उमेदवार हाजी सलीम शेख फत्तु यांचा भव्य प्रचार दौरा; मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग..

आबिद शेख/ अमळनेर
अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १३ (ब) मधून अपक्ष उमेदवार हाजी सलीम शेख फत्तु (हाजी शेखा मिस्त्री) यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस संकल्प आणि जनतेशी थेट संवाद प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा प्रचार दौरा अत्यंत भव्य आणि उत्साहवर्धक असा ठरला.
प्रचार रॅलीत प्रभागातील माताभगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशेषत: आया-बहिणींची लक्षणीय उपस्थिती रॅलीचे मुख्य आकर्षण ठरली. उमेदवाराला मिळालेल्या या जबरदस्त प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढलेला दिसून आला.
हाजी सलीम शेख फत्तु यांनी प्रभागातील जनतेशी संवाद साधताना सांगितले की,
“प्रभागाचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते-लाईट सुविधा, तसेच सर्वसामान्य कुटुंबांच्या अडचणींचे निराकरण हेच माझे प्राधान्य राहील. राजकारणासाठी नव्हे, तर लोकसेवेसाठी मी मैदानात उतरलो आहे.”
प्रभागातील नागरिकांनी उमेदवाराला विश्वास आणि साथ देण्याचे आश्वासन देत त्यांच्या विकासाभिमुख भूमिकेचे कौतुक केले.
या भव्य प्रचार दौऱ्यामुळे प्रभाग क्र. १३ (ब) मधील निवडणूक वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.
