अमळनेरच्या नेतृत्वासाठी पुढे सरसावले जितू ठाकूर — नगराध्यक्ष पदासाठी जोरदार उमेदवारी…

आबिद शेख/अमळनेर अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून
ठाकूर जितेंद्र हरिश्चंद्र (उर्फ जितू ठाकूर) यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
अमळनेरच्या जनतेचे मायमाऊली, मायबाप मानत
“आपल्या आशीर्वादावर, विश्वासावर आणि प्रामाणिक सदीच्छांवर उभा आहे”
असा विश्वास व्यक्त करत जितू ठाकूर यांनी आज आपला मनोगत ठेवला.
जनतेच्या प्रेमावर उभी राहिलेली उमेदवारी
नगराध्यक्ष पदाचे आरक्षण एस.टी. प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर
अमळनेर शहरात एकच नाव तोंडी तोंडी झळकले – ‘जितू भाऊ’!
सोशल मीडियावरही त्यांच्यावरील प्रचंड पाठिंबा दिसून आला.
वर्तमान आमदार व माजी मंत्री अनिल दादा भाईदास पाटील,
खासदार स्मिताताई वाघ, कृषिभूषण साहेवराव दादा पाटील,
लोकनेत्या जयश्रीताई पाटील तसेच दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते
यांनी ठेवलेला विश्वास हा त्यांच्यासाठी मोठा सन्मान असल्याचे ते म्हणाले.
संघर्षातून घडलेला नेता
साध्या चहाच्या टपरीपासून सुरू झालेली जीवनयात्रा…
गरीबी, संघर्ष, जबाबदाऱ्या आणि कठोर परिश्रमातून
B.A., M.A., M.Lib., LLB. पर्यंतचा प्रवास.
पत्रकारितेद्वारे अन्यायाविरुद्ध आवाज देत अनेकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न,
पण ‘व्यवस्था बदलली तरच खऱ्या अर्थाने न्याय देता येतो’ या जाणिवेतून
सार्वजनिक जीवनात उतरल्याचे त्यांनी सांगितले.
अमळनेरच्या भविष्यासाठी व्हिजन
परिवर्तनाची नवी दिशा — आधुनिक, विकसित आणि सुरक्षित अमळनेर
सर्व भागात पक्के रस्ते आणि सुस्थित गटारी
नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा
कार्यक्षम पथदिवे – प्रत्येक गल्ली उजळवणार
मोकाट जनावरांवर नियंत्रण – सुरक्षित शहर
शहर स्वच्छता मोहिमेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार
युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम
तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन
महिलांसाठी सुरक्षाविषयक उपाय
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा
विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी
ध्येय एकच – अमळनेरचे असे परिवर्तन करायचे की
इतर शहरांना अमळनेरचे उदाहरण द्यावे लागेल!
निवडणूक चिन्ह : शिट्टी (Whistle)“मी तुमचा २४ तासांचा सेवक जितू भाऊ
तरुणाईची उमेद, प्रामाणिक तळमळ आणि अमळनेरकरांसाठी सदैव उभा राहण्याची तयारी माझ्यात आहे.”
आपला नम्र ठाकूर जितेंद्र हरिश्चंद्र (उर्फ जितू ठाकूर)
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार
अमळनेर तालुका शहर विकास आघाडी
अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा!
