तांबेपुरा, अमळनेर येथे पहाटे दारूबट्टीवर पोलिसांची धडक कारवाई

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील तांबेपुरा परिसरात आज सकाळी सुमारे ७:३० वाजता पीएसआय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दारूबट्टीवर धाड टाकली. या कारवाईत सहायक स्टाफ सहित पथकाने संयुक्त कारवाई करत परिसरातील अवैध दारू व्यवसायावर मोठी धडक दिली.
अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने केलेली ही कारवाई उल्लेखनीय ठरली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अमळनेर शहरातील अशा प्रकारच्या अवैध धंद्यांवर आता पोलिसांकडून आणखी कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
