अमळनेर तालुका ठाकूर जमात एकवटली; नगराध्यक्ष पदासाठी जितू ठाकूर यांना एकमुखी पाठिंबा..

0
New-Doc-11-21-2025-20.59.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुका ठाकूर जमातीची महत्वाची मिटींग शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार श्री. जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (उर्फ जितू ठाकूर) यांच्या निवासस्थानी उत्साहात संपन्न झाली. या बैठकीस ठाकूर जमातीचे बहुसंख्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत सर्वानुमते श्री. जितू ठाकूर यांचे नाव ठाकूर समाजाच्या एकमेव उमेदवार म्हणून निश्चित करण्यात आले. यावेळी संपूर्ण ठाकूर समाजाच्यावतीने त्यांना एकमुखी पाठींबा जाहीर करण्यात आला. आगामी नगराध्यक्ष निवडणुकीत श्री. जितू ठाकूर यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी सर्व ठाकूर बांधव एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार करण्यात आला.

या प्रसंगी अमळनेर तालुका आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. दिलीप धोंडू ठाकूर, तसेच अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन आणि ठाकूर जमात सेवा मंडळाचे महाराष्ट्र सरचिटणीस रणजित शिंदे सर यांनी मार्गदर्शन करत समाज एकतेचे महत्त्व स्पष्ट केले.

बैठकीचे शेवटी, समाज ऐक्य, नेतृत्वावरील विश्वास आणि विकासाचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed