प्रभाग १३ (ब) मध्ये ‘लोकांचा हक्काचा माणूस’ हाजी सलीम शेख फत्तू यांना वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १३ (ब) मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रभागात अनेक वर्षांपासून लोकांच्या सुख-दुःखातील साथीदार म्हणून ओळख असलेले हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री) यांना नागरिकांचा प्रचंड उत्स्फूर्त आणि मनापासून प्रतिसाद मिळत आहे.
हाजी सलीम शेख फत्तू हे केवळ राजकारणी नाव नाही, तर प्रभागातील सर्व समाजाच्या मनात घर करणारे आपुलकीचे व्यक्तिमत्त्व आहे. कोणतेही दुखणे असो, समाजातील समस्या असो किंवा विकासकामांची गरज… त्यांनी सदैव प्रत्येकाच्या मदतीला धाव घेऊन आपलं नातं हे राजकारणापेक्षा मोठं मनाचं आणि माणुसकीचं असल्याचं दाखवून दिलं आहे.
“विकास सर्वांचा… सन्मान प्रत्येकाचा!” – हाजी सलीम यांचा मुख्य मंत्र
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची दूरदृष्टी, साधेपणा, लोकांशी मनमोकळा संवाद आणि सर्वसमावेशक विचारसरणी यामुळे त्यांच्यावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
सर्व समाजातून — जेष्ठ नागरिक, महिला, युवक, व्यापारी, कामगार — अशा सर्वांकडून हाजी सलीम यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून, त्यांच्या उमेदवारीभोवती सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
मनमिळाऊ स्वभावामुळे जनतेच्या मनात स्थान
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरलेल्या हाजी सलीम शेख फत्तू यांचे
“लोकांचा हक्काचा माणूस” हे प्रतिमान आजही पूर्वीसारखेच जनमानसात ठामपणे टिकून आहे.
त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत राजकीय दिखावा नसून प्रत्यक्ष लोकांमध्ये राहून समस्यांचे निवारण करण्याची जिद्द जाणवते.
प्रभाग १३ (ब) मध्ये त्यांच्या उमेदवारीला सर्व समाजाचा वाढता प्रतिसाद
यावेळी निवडणुकीत हाजी सलीम यांच्या नेतृत्वाबद्दल जनतेत चांगली चर्चा असून,
त्यांच्या प्रामाणिक कामगिरीमुळे आणि सर्वसमावेशक विचारांमुळे त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे.

