वार्ड क्रमांक ५ (ब) मध्ये ‘शिक्षित अपक्ष उमेदवार’ शेख आशु परवीन रफिक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; विकासासाठी मतदारांना विनंती..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – आगामी नगरपरिषद निवडणुकीत वार्ड क्रमांक ५ (ब) मधून (एफ.वाय.बी.ए.) शिक्षण घेतलेली शेख आशु परवीन रफिक या अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी जाहीर केली असून, “आपला ध्यास फक्त विकास” या ब्रीदवाक्यासह त्यांनी मतदारांपर्यंत आपला विकासदृष्टीकोन पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.
परवीन रफिक यांनी मतदारांना भावनिक आवाहन करताना सांगितले की, “शिक्षित नगरसेविका निवडून द्यावी हीच माझी नम्र विनंती. आपल्या वाड्याचा सर्वांगीण विकास आणि प्रगती हेच माझे एकमेव ध्येय आहे.”
वार्डातील मूलभूत सुविधांच्या उभारणीसह महिलांच्या प्रश्नांवर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. शिक्षित व प्रामाणिक नेतृत्व म्हणून त्यांना स्थानिक महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचेही दिसून येत आहे.
वार्ड क्रमांक ५ (ब) मधील नागरिकांमध्ये परवीन रफिक यांच्या उमेदवारीची सध्या जोरदार चर्चा असून, समर्पित आणि विकासाभिमुख नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडून अनेकांना मोठ्या अपेक्षा आहेत.

