शेख जुबेदा बी यांना उमेदवारी जाहीर होताच मतदारांचा वाढता उत्स्फूर्त प्रतिसाद..

0
New-Doc-11-21-2025-06.52.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या वतीने आगामी नगरपरिषद निवडणूक २०२५-३० साठी प्रभाग क्र. १३ (अ) मधून शेख जुबेदा बी हाजी नसिरोद्दीन यांना नगरसेविका पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाकडून मिळालेल्या या उमेदवारीबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करत जनसेवेसाठी स्वतःला समर्पित ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
शेख जुबेदा बी यांनी सांगितले की, “आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली आहे. या विश्वासाचा मान राखत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक कार्यपद्धतीसाठी आणि जनसेवेसाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. आपला आशीर्वाद आणि विश्वास हेच माझे मोठे बळ आहे.”
प्रभाग क्र. १३ (अ) मध्ये शहरी विकास, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला व युवकांसाठी उपयुक्त उपक्रम, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यावर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहर विकास आघाडीने अनुभवी, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख उमेदवार म्हणून शेख जुबेदा बी यांची निवड केल्याने स्थानिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
त्यांच्या प्रचारात ‘प्रभागाच्या प्रगतीचा नवा अध्याय’ हा मुख्य संदेश देत ते लवकरच घरोघरी जाऊन जनसंपर्क मोहीम सुरू करणार आहेत.

नागरिकांनी मोठ्या उत्साहाने त्यांना शुभेच्छा दिल्या असून, प्रभागात सक्रिय, प्रामाणिक आणि उत्तरदायी नेतृत्व मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
— शेख जुबेदा बी हाजी नसिरोद्दीन
अधिकृत उमेदवार – प्रभाग क्र. १३ (अ)
अमळनेर तालुका शहर विकास आघाडी हेडिंग चेंज वाढता प्रतिसाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed