मोबाईल व्यापारी असोसिएशन चा शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांना पाठींबा जाहीर..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर मोबाईल व्यापारी असोसिएशन चा शहर विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्यात आला शहराच्या विकासाचे व्हिजन व दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेऊन व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेता मोबाईल व्यापारी असोसिएशन तर्फे अमळनेर तालुका शहर विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.व्यापाऱ्यांच्या अडचणी सोडवायला केव्हाही आवाज द्या रस्त्यावर हात देऊन हक्काने थांबवा असे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांनी व्यापाऱ्यांना आश्र्वासित करतांना सांगितले यावेळी मोबाईल व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रविण बी.महाजन यांनी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन व्यापारांना केले आहे.या वेळी अध्यक्ष प्रवीण महाजन,तसेच निलेश चौधरी,तन्वीर मोमिन, रेहान शेख,महेश नागदेव,भागवत वाणी,मेकर्स सोनार,निलेश पाटील, लालसाई सिंधी, राहुल ठाकूर,निलेश कोळी,दीपक भगवानी,दिनेश जैन, प्रवीण भाटिया यांचा सह मोठ्या प्रमाणावर व्यापारी बांधव उपस्थित होते.

