अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : प्रभाग ९ (ब) मधून पंकज पंडीत चौधरी यांची उमेदवारी जाहीर – विकासासाठी कटिबद्ध नेतृत्वाची मतदारांकडून अपेक्षा..

0
New-Doc-11-20-2025-07.41.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ (ब) मधून पंकज पंडीत चौधरी यांनी उमेदवारी जाहीर केली असून, त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. विविध नागरी प्रश्नांवर सातत्याने लढा देत प्रभागातील लोकांच्या हक्कांसाठी नेहमी अग्रस्थानी राहिल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंकज पंडीत चौधरी यांनी गेल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांची उचल घेत प्रभागाच्या विकासाला दिशा दिली. शहराची ओळख असणारा ऐतिहासिक दगडी दरवाजा पुनर्निर्माणाचा प्रश्न असो, कोरोनाच्या कठीण काळात दिलेली तातडीची मदत असो किंवा विविध नागरी समस्या — प्रत्येकवेळी मतदारांच्या सोबत राहून त्यांनी संघर्ष केला आणि यश मिळवून दिले.
दिव्यांग बांधवांचे प्रश्न, अतिक्रमित बांधवांच्या अडचणी, व्यापारी बांधवांना भेडसावणाऱ्या समस्या यावरही त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनासमोर आवाज उठवला. या सर्व क्षेत्रांत त्यांनी दिलेला न्याय आणि केलेले काम पाहता प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “प्रभागाचा हक्क, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकास हीच माझी प्राथमिकता. आतापर्यंत जे प्रश्न सोडवले ते केवळ सुरुवात आहे. भविष्यात अधिक व्यापक विकास आराखड्यासह काम करण्याची तयारी आहे.”
प्रभाग ९ (ब) मधील मतदारांना उद्देशून त्यांनी आवाहन केले आहे की, “माझ्यावर दाखवलेला विश्वास अमूल्य आहे. प्रचंड मतांनी विजयी करून आपल्या सेवेची संधी द्यावी. प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी माझे कार्य अखंड चालू राहणार आहे.”
अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग ९ (ब) मध्ये आता प्रचाराची रंगत वाढत असताना, पंकज पंडीत चौधरी यांच्या उमेदवारीमुळे या प्रभागात चुरस अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे. त्यांच्या विकासोन्मुख कामगिरीमुळे त्यांच्याकडे मतदारांची अपेक्षा मोठ्या प्रमाणात वळत असल्याचेही पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed