थरकाप उडवणारी घटना : पाच वर्षीय बालिकेवरील अत्याचार. हत्येप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची अमळनेरमध्ये जोरदार मागणी..

0
New-Doc-11-20-2025-07.28.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अवघ्या पाच वर्षांच्या निरागस चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निघृण हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. समाजमनाला चटका लावणाऱ्या या कृत्याविरोधात तीव्र संताप व्यक्त करत अमळनेर शहरात विविध सुवर्णकार संघटनांतर्फे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

डोंगराळे (ता. मालेगाव) येथे घडलेल्या या थरकाप उडवणाऱ्या घटनेत पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या अत्याचारामुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे.

या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील दि सोनार सराफ असोसिएशन, हस्तशिल्प सुवर्णकार कारागीर वेल्फेअर असोसिएशन, सुवर्णकार मित्र मंडळ यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामधून संबंधित आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी ठाम आणि जोरदार मागणी करण्यात आली.

संघटनांनी या निर्घृण कृत्याचा निषेध व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed