प्रभाग १८ मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आज नारळ फोडून करण्यात येणार सुरुवात…

0
IMG-20251120-WA00081.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – आगामी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (अ) व १८ (ब) मध्ये प्रचाराचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात होणार आहे.

“प्रभागाच्या विकास हाच मुख्य उद्देश, व तेच अंतिम ध्येय” या ब्रीदवाक्यासह शुभारंभाचा पवित्र क्षण नारळ फोडून करण्यात येणार असून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराला अधिकृत सुरुवात होईल.
दिनांक: २०-११-२०२५
वार: गुरुवार
वेळ: सकाळी १० वाजता
स्थळ: बहुदेशी सभागृहासमोर, अमळनेर
या कार्यक्रमात गणेश आनंद पवार (प्रभाग क्र. १८-अ – अनुसूचित जमाती उमेदवार) व सौ. अनिता विनोद लांबोळे (प्रभाग क्र. १८-ब – सर्वसाधारण महिला राखीव) आपला प्रचारारंभ करणार आहेत.
सौ. अनिता विनोद लांबोळे या मा. उपनगराध्यक्ष नानासो. विनोद रामचंद्र लांबोळे (बिजू नाना) यांच्या सौभाग्यवती असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन:
या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून मानाचा सहभाग नोंदवावा.
“जनतेच्या आशीर्वादाने… विकासाला सुरुवात!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed