मुलांच्या श्रमदानातून परिसरात निर्माण झाले खेळाचे मैदान! कर्मभूमी स्मारक परिवाराचा उपक्रम व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर –विद्युतप्रवाह कॉलनी व पटवारी कॉलनीच्या मधील नगरपालिका हद्दीतील मोकळ्या जागेत परिसरातील लोक कचरा टाकत असल्याने तेथे दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली होती. या परिसरातील मुलांना खेळण्यासाठी जागा नसल्याची व्यथा त्यांनी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या सचिव दर्शना ताई पवार यांच्यासमोर मांडली.
या समस्येचा गांभीर्याने विचार करून स्मारक परिवारातील तरुणाई—चेतन भोई, शुभम पवार, किशोर महाजन, तुषार पाटील तसेच मार्गदर्शक चेतन भाऊ, गोपाल सर, डॉ. अतुल चौधरी, प्रा. श्याम पवार—यांनी मुलांसोबत जागा स्वच्छतेचे नियोजन केले.
मुलांनी स्वतः श्रमदान करत परिसरातील कचरा हटवला आणि जागा स्वच्छ केली ही आनंद देणारी घटना आहे.
“मुले देवाघरची फुले” असे साने गुरुजी म्हणत; त्यांचीच ही शिकवण प्रत्यक्षात उतरल्याचा अनुभव स्मारक परिवाराने व्यक्त केला. स्वच्छतेनंतर मुलांना अखेर खेळण्यासाठी सुंदर मैदान मिळाले.
यानिमित्ताने मुलांशी संवाद साधताना स्मारक परिवाराने सांगितले—
“भरपूर खेळा, वाचन करा, श्रमाची लाज बाळगू नका. कधी भांडण झाले तरी माफ करा, पुन्हा एकत्र या आणि अभ्यासालाही प्राधान्य द्या.”
मैदान स्वच्छता उपक्रम आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशांत मनिषा तेजपाल, तेजस दिपाली योगेश, समर्थ उज्ज्वला अविनाश, मेहुल मनिषा राहुल, निरज मोदींनी सचिन, आदी ज्योती संतोष, ओम भावना मनोहर, ज्योती बोरसे यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमास परिसरातील अनेक पालकही उपस्थित होते.
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अरविंद सराफ यांनी मोबाईलद्वारे मुलांचे अभिनंदन करत त्यांना सदिच्छा दिल्या.
