जनमाणसाचं प्रतिबिंब..!
महादर्पण
रविवार, १६ नोव्हेबर २०२५
अनिता विनोद लांबोळे यांचा उमेदवारी अर्ज जल्लोषात दाखल
अमळनेर : नगरपरिषद सार्वत्रिक
निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (ब) सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी अनिता विनोद लांबोळे यांनी दिनांक १५ रोजी ढोल-ताश्यांच्या गजरात, वाजतगाजत आणि उत्साहपूर्ण वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्यासाठी जाताना त्यांच्या समर्थक महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताश्यांच्या तालावर नाचत, जल्लोष करत लांबोळे यांच्या समर्थकांनी संपूर्ण परिसरात निवडणुकीचा माहोल रंगवला.
अर्ज दाखल करताना अनिता लांबोळे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी
कटिबद्ध असल्याचे सांगितले. पाणी, रस्ते, स्वच्छता, महिलांसाठी सुविधा आणि मूलभूत विकास कामांना प्राधान्य देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
प्रभाग १८ (ब) मध्ये अनिता लांबोळे यांना मिळत असलेल्या उदंड प्रतिसादानंतर निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे अधिकच स्पष्ट झाली असून नागरिकांचे लक्ष आता उमेदवारांच्या पुढील प्रचारकार्यावर लागले आहे. बातमी चेंज करून पाहिजे हेडिंग सह
