“अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी माझी उमेदवारी” — नगराध्यक्षपदाचे इच्छुक उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा संकल्पनामा जाहीर..

0
New-Doc-11-16-2025-21.58.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :- आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी आज आपल्या सर्वांगीण विकासाच्या व्हिजनसह संकल्पनामा जाहीर केला. अमळनेर शहराच्या जल, आरोग्य, सुरक्षा, स्मार्ट सेवा, उद्यान व्यवस्था अशा सर्वच क्षेत्रांचा सर्वंकष विकास करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

दररोज पाणीपुरवठ्यासाठी विशेष योजना अमळनेरातील पाणीटंचाई पूर्णपणे दूर करण्यासाठी स्वतंत्र जलपुरवठा योजना राबविण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिले. पाणी पुनर्वापर प्रणाली, गळती नियंत्रण पथक, तसेच त्वरित पाईपलाईन दुरुस्ती या उपाययोजनांमुळे “प्रत्येक घराला दररोज पाणी” हे उद्दिष्ट साध्य करण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला.

प्रत्येक प्रभागात ग्रीन पार्क व ओपन जिम मुलांसाठी सुरक्षित व सुंदर ग्रीन पार्क, खेळ-शिक्षण-अनंद यांचा संगम असलेली उद्याने ही प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठांसाठी ओपन एअर जिम तसेच “स्नेहबंध दिवस केंद्र” उभारून वृद्धांची काळजी घेणारी यंत्रणा उभारली जाणार आहे.

मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणार शहरातील सर्व रस्ते प्रकाशमान ठेवणे, स्वच्छ नाली व्यवस्था, नियमित कचरा संकलन, “स्वच्छ अमळनेर” मोहीम अशा उपक्रमांद्वारे संरचनात्मक सुधारणा करण्यात येतील. नगरपालिका शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे आणि रुग्णवाहिका सुविधा देण्याचाही संकल्प त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रशासन—प्रत्येक तक्रारीवर 24 तासांत प्रतिसाद

ई-नगरपालिका अ‍ॅपच्या माध्यमातून कर, परवाने, अर्ज संपूर्णतः ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. ऑनलाईन तक्रारींवर 24 तासांत प्रतिसाद देणारी डिजिटल यंत्रणा तयार करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

शहराची सुरक्षा मजबूत—सीसीटीव्ही कवच

महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, चोरीचे प्रमाण घटवणे ही प्राथमिकता असेल. झोपडपट्टी पुनर्वसन, प्रभागनिहाय सांस्कृतिक हॉल, समाजमंदिरे उभारणी हीही महत्त्वाची कामे असल्याचे त्यांनी सांगितले.

जितेंद्र ठाकूर यांच्या “स्वच्छ, समृद्ध, सुरक्षित व आत्मनिर्भर अमळनेर” या संकल्पनामाला शहरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या उमेदवारीला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed