प्रभाग १३ महिला राखीव : जुबैदा बी हाजी नसिरुद्दीन शेख आज नगरसेविका पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार..

0
New-Doc-11-16-2025-10.36.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : प्रभाग क्रमांक १३ (महिला राखीव) मधून समाजहिताची भावना आणि सेवाभाव घेऊन उभ्या राहिलेल्या जुबैदा बी हाजी नसिरुद्दीन शेख आज अधिकृतपणे नगरसेविका पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. “जनता की सेवा के नए सफ़र की शुरुआत में, जुबैदा बी हाजी नसिरुद्दीन शेख अब आपके साथ में…” या संदेशातून त्यांनी आपल्या जनसेवा प्रवासाची सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

जुबैदा बी म्हणाल्या,
“मी, जुबैदा हाजी नासिरुद्दीन शेख, प्रभाग क्र. १३ – महिला आरक्षित या प्रभागातून नगरसेविका पदासाठी खिदमत करण्याच्या इराद्याने आज उमेदवारी अर्ज भरत आहे. आपल्या दुआ, भरोसा आणि साथ नेहमीप्रमाणे मिळावा ही नम्र विनंती.”

स्थानिक पातळीवर मागील काही वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय असून प्रभागातील पाणी, स्वच्छता, रस्ते, पायाभूत सुविधा आणि महिलांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. त्यांच्या साधेपणा, लोकाभिमुख स्वभाव आणि सर्वसामान्यांशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे त्यांना चांगला लोकसमर्थन मिळत असल्याचे दिसते.

आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुढील काही दिवसांत मतदारांशी संवाद साधत विकासाचा रोडमॅप जनतेसमोर मांडण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. प्रभाग १३ मध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed