“बोलण्यात नाही तर, कामात विकास दिसतो!” — हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री). अक्सा शादी हॉल उभारणीमुळे नागरिकांच्या सोयींमध्ये मोठी वाढ.
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-30 च्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये विकासकामांची चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग क्रमांक १३ (ब) मधील सर्वसाधारण मतदारसंघात हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री) हे लोकांच्या अपेक्षांचे केंद्रबिंदू बनले आहेत. ‘बोलण्यात नाही तर, कामात विकास दिसतो!’ या भूमिकेतून त्यांनी नागरिकांसाठी केलेल्या कामांची उजळणी सध्या भागातील जनतेत चर्चेचा विषय ठरत आहे.

कसाली मोहल्ला परिसरात अनेक वर्षांपासून लग्न समारंभांसाठी योग्य हॉलची कमतरता भासत होती. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबांना लग्नासाठी जागा मिळवणे मोठे आव्हान बनले होते. ही अडचण ओळखून हाजी सलीम शेख फत्तू यांनी या भागातील नागरिकांसाठी एक स्थायी आणि उपयुक्त सुविधा उभारण्याचा ध्यास घेतला.
त्यातूनच ‘अक्सा शादी हॉल’ या आधुनिक व प्रशस्त सुविधा असलेल्या विवाह हॉलची उभारणी झाली. कोणत्याही परिस्थितीत हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. आज अक्सा शादी हॉल केवळ एक इमारत नाही, तर सामान्य नागरिकांसाठी उभा केलेला सामाजिक आधारस्तंभ बनला आहे.
या हॉलमुळे कसाली मोहल्ला आणि परिसरातील नागरिकांना कमी दरात,स्वच्छ व सुसज्ज जागा,
विवाह व इतर कार्यक्रमांसाठी सोयीची सुविधा
उपलब्ध झाली आहे अल्पदरात उपलब्ध असलेल्या या हॉलने अनेक कुटुंबांची आर्थिक बचत केली असून, भागातील नागरिकांनी या कामाचे मुक्तकंठाने स्वागत केले आहे. समाजकार्यात सक्रिय असलेल्या हाजी सलीम शेख फत्तू यांना या उपक्रमामुळे प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
प्रभागात छोटी-मोठी अनेक कामे उभी करून जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी ते नेहमी तत्पर राहिले आहेत. अक्सा शादी हॉल हे त्यांच्या विकासविषयक कामांचे ज्वलंत उदाहरण ठरत असून, नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर ठोस उपाय करणारा लोकाभिमुख दृष्टिकोन त्यांचे नेतृत्व अधोरेखित करतो.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून, प्रभाग क्रमांक १३ (ब) मध्ये हाजी सलीम शेख फत्तू यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.
भागातील अनेक नागरिकांच्या मते— “शेखा मिस्त्री नि केलेले काम दिसते, बोलून नाही तर प्रत्यक्ष विकास करून दाखवतात…!”
आगामी निवडणुकीत त्यांचे काम जनतेला भावते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
