चाळीसगावच्या नॅशनल हायस्कूलची U-14 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी..

0
New-Doc-11-15-2025-23.10.jpg

24 प्राईम न्यूज 16 Nov 2025

चाळीसगाव – नॅशनल हायस्कूल, चाळीसगावच्या क्रिकेटपटूंनी पुन्हा एकदा आपली दमदार कामगिरी सिद्ध करत शाळेचा मान उंचावला आहे. दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी जळगाव येथे पार पडलेल्या U-14 जिल्हा स्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत नॅशनल हायस्कूल संघाने उत्कृष्ट खेळ सादर करत जिल्हा उपविजेतेपद पटकावले.

या उल्लेखनीय यशाबद्दल संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

आज 15 नोव्हेंबर 2025 रोजी शाळेचे मुख्याध्यापक श्री. खान सलीम सर व सर्व शिक्षकवर्ग तसेच कादरिया एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. दस्तगीर खान सर यांच्या उपस्थितीत स्पोर्ट्स टीचर श्री. मोहसिन सर आणि सर्व विद्यार्थी खेळाडूंचा औपचारिक स्वागत करण्यात आला. खेळाडूंच्या जिद्दीला, शिस्तीला व टीमस्पिरिटला विशेष दाद देण्यात आली.

नॅशनल हायस्कूलच्या या कामगिरीने संपूर्ण शहराचा अभिमान वाढवला असून, भविष्यात राज्य व राष्ट्रीय स्तरावरही अशीच यशस्वी कामगिरी करत शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed