नगराध्यक्षपदासाठी जितेंद्र (जितू) ठाकूर यांचा उदय — शहराच्या पसंतीचा प्रबळ दावेदार!

0
New-Doc-11-15-2025-22.41-1.jpg

आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात उमेदवारांच्या चर्चेला वेग आला असून नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे जितेंद्र उर्फ जितू ठाकूर. स्थानिक नागरिकांपासून विविध पक्षातील नेत्यांपर्यंत सर्वत्र ठाकूर यांच्या नेतृत्वगुणांचे, सक्रिय कामकाजाचे आणि सर्वसामान्यांशी जोडलेल्या नात्याचे कौतुक होत आहे. यामुळेच ते निवडणुकीतील प्रबळ दावेदार म्हणून उदयास येत आहेत.

शहरातील सर्वसामान्यांच्या समस्यांवर पत्रकारितेच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवणारा, लोकांमध्ये सतत राहून मदत करणारा, स्वच्छ प्रतिमा आणि स्पष्टवक्ता म्हणून ओळखले जाणारे जितू ठाकूर यांनी गेल्या काही वर्षांत शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, रस्तेविकास, पाणीपुरवठा, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
यामुळे नागरिकांमध्ये “काम करणारा नगराध्यक्ष हवा असेल तर जितू ठाकूर हेच योग्य पर्याय” अशी भावना मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.

विविध सामाजिक उपक्रम, युवकांच्या प्रोत्साहनासाठीचे प्रयत्न, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेली दिशा आणि संघटन कौशल्यामुळे त्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक राजकीय नेत्यांनीही ठाकूर यांच्या कामपद्धतीला पसंती दर्शवली असून त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

शहरातील गल्ल्या-नाका, बाजारपेठ, तसेच सामाजिक माध्यमांवर ठाकूर यांच्या समर्थनाचा जोरदार माहोल दिसून येतो.
या पार्श्वभूमीवर जितेंद्र उर्फ ‘जितू’ ठाकूर हे नगराध्यक्ष पदासाठी प्रभावी, लोकप्रिय आणि आघाडीचे उमेदवार म्हणून उदयास आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed