अनिता लांबोळे १५ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार.प्रभाग १८ (ब) मध्ये उत्स्फूर्त पाठिंब्याचे वातावरण..
आबिद शेख/ अमळनेर

अमळनेर :नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (ब) सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी अनिता विनोद लांबोळे या शनिवार, आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमासाठी महाडा कॉलनी रुबजी नगर, कंजर वाडा, शिवम नगर, संत रोहिदास नगर, मरिमाता नगर, बहादरपूर नाका, संताजी चौक, भोईवाडा, माळीवाडा, अमलेश्वर नगर, शहालम नगर, शिवम नगर या परिसरांतील तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बिरजू नानांवर प्रेम करणारे सर्व समर्थकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रुबजी नगर परिसरात सकाळी ठिक १०.०० वाजता नागरिक आणि समर्थकांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गतकाळात अनिता लांबोळे यांच्या पतींचे विनोद लांबोळे उर्फ बिरजू नाना यांनी प्रभागातील विविध भागांत केलेल्या विकासात्मक कार्यामुळे महिलांमध्ये व नागरिकांमध्ये अनिताताईंबाबत प्रचंड उत्साह व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांच्या या उत्स्फूर्त पाठिंब्याच्या जोरावर अनिता लांबोळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

