“जनतेचा उमेदवार” म्हणून जितेंद्र ठाकूर यांना शहरभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद..

0
New-Doc-11-15-2025-07.20.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर :- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापत असताना नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून जितेंद्र (जितू) ठाकूर यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत शहरातील समस्यांची जवळून जाण असलेल्या ठाकूर यांना नागरिकांतून वाढता पाठिंबा मिळत असून त्यांच्या इच्छुक उमेदवारीस शहरभर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

गेल्या दोन दशकांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून रस्ते, पाणीपुरवठा, नालेसफाई, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा अशा जनजीवनाशी निगडित मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. या कार्यातून त्यांनी जनतेच्या समस्यांना दिलेली प्राधान्यकता वागरली असून त्यामुळेच ते ‘जनतेचा उमेदवार’ म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.

शहर विकासासाठी स्पष्ट आणि ठोस दृष्टीकोन

शहराच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप, तातडीने छोटे-छोटे स्थानिक प्रश्न सोडवण्याची तयारी, तसेच भेदभावापलीकडे जाऊन कार्य करण्याची ओळख – या गुणांमुळे अनेक मतदार त्यांना पसंती दर्शवत आहेत.
“सामान्य माणसांच्या दैनंदिन अडचणींची खरी जाण जितू भाऊंना आहे,” अशी प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

युवा आणि व्यापारी वर्गाकडूनही जोरदार पाठिंबा

शहरातील व्यापारी भाग, बाजारपेठ, नव्याने विकसित होत असलेले उपनगर – सर्वच ठिकाणांहून त्यांना मिळणारा पाठिंबा वाढत आहे. अनेकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांना समर्थन दिल्याचे दिसून येते. युवा मतदारांच्या मध्येही त्यांच्याविषयी मोठी उत्सुकता असून,
“शहर बदलायचं असेल तर स्थानिक, स्वच्छ प्रतिमा असलेला आणि काम करणारा नेता हवा,” अशी भावना व्यक्त होत आहे.

त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की, पारदर्शक, जबाबदार आणि संवादप्रधान प्रशासन देण्याची क्षमता ठाकूर यांच्यात असून, शहराच्या विकासाला नवीन दिशा देण्याची क्षमता त्यांच्यात आहे.
सध्या मिळत असलेल्या प्रतिसादावरूनच त्यांच्या विजयाची शक्यता दाट असल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed