प्रभाग ९अ मध्ये ‘सेवा, विकास आणि विश्वास’चा संकल्प — सौ. मयुरी पंकज साळी उमेदवार म्हणून उभ्या..
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर :अनेक वर्षांपासून आपल्या प्रभागातील सुख-दुःखात, अडचणीत, संकटसमयी मदतीला धावून जाणारा तरुण कार्यकर्ता म्हणून पंकज अशोक साळी यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. राजकारणापलीकडे जाऊन समाजसेवा हेच ध्येय मानणाऱ्या साळी यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन जनतेने दिलेल्या पाठिंब्याच्या बळावर आता त्यांच्या धर्मपत्नी सौ. मयुरी पंकज साळी या आगामी नगरपालिका निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक ९ अ (सर्वसाधारण महिला राखीव) या जागेसाठी उमेदवार म्हणून उभ्या राहत आहेत.
साळी दांपत्याचा संकल्प —
“सेवा, विकास आणि विश्वास हाच आमचा धर्म.”
प्रभागातील प्रत्येक गल्लीत स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, महिलांसाठी सन्मानजनक वातावरण, युवकांसाठी संधी आणि सर्वसमावेशक विकास घडविण्याचा निर्धार साळी यांनी व्यक्त केला आहे.
नागरिकांच्या प्रत्येक समस्येवर प्राधान्याने उपाय
महिला आणि मुलींसाठी सुरक्षित वातावरण
युवकांसाठी रोजगार, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना
पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज व मूलभूत सुविधा मजबूत करणे
वृद्ध, दिव्यांग व गरजूंसाठी मदतीचा हात
पारदर्शक, जबाबदार आणि जनसंपर्कावर आधारित प्रशासन
पंकज साळी म्हणाले की, “आपल्या सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी आम्ही सदैव आपल्या सेवेसाठी तत्पर राहू. आपण दाखवलेल्या विश्वासाचा भंग कधीच होऊ देणार नाही.”
जनतेने आजवर दाखवलेल्या प्रेम आणि पाठिंब्याची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन करत साळी परिवाराने प्रभागातील मतदारांना सौ. मयुरी पंकज साळी यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर — साळी परिवार
संपर्क : 92269 99693
