जनतेच्या विश्वासाचा उमेदवार — शेखा मिस्त्री. अमळनेर नगरपरिषद निवडणूक : सलीम शेख (शेखा मिस्त्री) यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज…
आबिद शेख/ अमळनेर


अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ला सुरुवात होत असून प्रभाग क्रमांक १३ (सर्वसाधारण) मधील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उत्साहपूर्ण वातावरण आहे. त्यानुसार सलीम शेख उर्फ शेखा मिस्त्री यांनी आज मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना मुस्लिम समाज बांधवांसह प्रभागातील विविध स्तरांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील समस्या जाणून त्या दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प शेखा मिस्त्री यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज सादर करण्याचा त्यांचा साधा पण प्रभावी कार्यक्रम प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवणारा ठरला. आगामी निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद घेऊन विकासाच्या नवीन दिशेने वाटचाल करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

