अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : नगराध्यक्षपदासाठी दोन, सदस्यपदासाठी २४ अर्ज दाखल..
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. गुरुवारी (दि. 13) दिवसभरात नगरसेवक पदासाठी 19 अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण 24 अर्ज प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज दाखल झाले असून हे दोन्ही अर्ज जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांनी अमळनेर शहर विकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर दाखल केले आहेत.
गुरुवारी सदस्य पदासाठी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे
अमळनेर तालुका व शहर विकास आघाडी कडून: अफसाना खाटिक (प्रभाग २), शोभाबाई गढरे (प्रभाग ३), भरतकुमार ललवाणी (प्रभाग ३), हर्षल संदानशिव (प्रभाग ६), रेखा पाटील (प्रभाग ७), प्रवीण गंगाराम पाटील (प्रभाग ७), विश्वास पाटील (प्रभाग १४), राजेश पाटील (प्रभाग १६), विद्या भदाणे (प्रभाग १६).
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून: भरतकुमार ललवाणी (प्रभाग ३), रेखा पाटील (प्रभाग ७), राजेश पाटील (प्रभाग १६), विद्या भदाणे (प्रभाग १६).
शिवसेना (शिंदे गट) कडून: कृष्ण बहारे (प्रभाग ३).
अपक्ष उमेदवार: कल्पना शर्मा (प्रभाग ९), विश्वनाथ पाटील (प्रभाग १६), नीलिमा पाटील (प्रभाग १६).
या अर्जदारांमुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील सर्वच प्रभागांमध्ये विविध पक्ष व आघाड्यांचे उमेदवार रिंगणात उतरले असून मतदारांसमोर पर्यायांची मालिका निर्माण झाली आहे.
