१५ महिन्यात सिंदूर उत्पादनाचा विक्रम!कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा ‘राज फॉर्म’वरील अभिनव कृषी प्रयोग यशस्वी..

0
New-Doc-11-14-2025-09.44.jpg

आबिद शेख/अमळनेर

राजवड :कृषि क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जाणारे कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी पुन्हा एकदा एक आगळा–वेगळा विक्रम नोंदवला आहे. राजवड येथील त्यांच्या “राज फॉर्म”मध्ये १५ ऑगस्ट २०२३ रोजी सिंदूर रोपांची लागवड करण्यात आली होती. साधारणपणे सिंदूर पिकाचे पहिले उत्पादन मिळण्यासाठी किमान ३ वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. मात्र पाटील यांनी अवघ्या १५ महिन्यांतच प्रथम उत्पादन घेण्यात यश मिळवले असून हा प्रयोग स्थानिक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

१३ नोव्हेंबर २०२5 रोजी दुसऱ्या हंगामाची पाहणी करताना सिंदूर झाडांवर आलेली जोमदार फळधारणा पाहून स्वतः कृषिभूषण पाटीलही समाधानी दिसत होते. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, मातीची योग्य निगा, वेळोवेळी केलेली खत व्यवस्थापन आणि पाण्याचा कार्यक्षम वापर या सर्वांचा योग्य ताळमेळ साधल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याचे ते म्हणाले.

सिंदूर लागवड व उत्पादनात एवढ्या कमी कालावधीत मिळवलेले हे यश राजवड परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक ठरत असून भविष्यात सिंदूर पिकाच्या व्यावसायिक संधींनाही यामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed