अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 : हाजी सलीम शेख फत्तू ( शेखा मिस्त्री) यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करणार — जनसेवेचा संकल्प, विकासाची नवी दिशा.

0
New-Doc-11-13-2025-22.43-1.jpg

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025-30 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 13 (सर्वसाधारण) मधून नगरसेवक पदासाठी हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री) यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम शुक्रवार, दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

कासाली मोहल्ला अमळनेर येथील त्यांच्या राहत्या घरी समर्थक व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हाजी सलीम शेख फत्तू यांनी “जनसेवेचा संकल्प — विकासाची नवी दिशा” या घोषवाक्यासह आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर प्रभागातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पूर्वी नगरसेवक पदावर कार्यरत असताना हाजी शेखा यांनी भागातील सर्वांगीण विकासावर भर दिला. शादी हॉल बांधकाम,उर्दू शाळा न ६ बांधकाम, माळी मळी पासून संत सखाराम महाराज पाई चालतात तो रस्ता ,प्रत्येक गलीत पेवर ब्लॉक बसविणे, खरोट कब्रस्तान व वालकंपाऊंड ,व्यामशाळा, अशी अनेक विकास कामे त्यांच्या कार्यकाळात यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहेत.

त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये त्यांचा विशेष सन्मान आहे. विधवा महिला, गरजू व वंचित घटकांना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर राहिले आहेत.

हाजी सलीम शेख फत्तू म्हणाले —

“माझ्या प्रभागातील नागरिकांनी मला सदैव विश्वास आणि प्रेम दिले आहे. पुन्हा एकदा संधी मिळाल्यास मी ती संधी जनतेच्या विकासासाठी अधिक जोमाने वापरेन.”

नागरिकांकडून त्यांच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद त्यांच्या सोबत कायम राहील, असा विश्वास हाजी सलीम शेख फत्तू यांनी व्यक्त केला आहे.

आपलाच —
हाजी सलीम शेख फत्तू (हाजी शेखा मिस्त्री)
मा. नगरसेवक, अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed